ताज्या कविता:
Home » » मालवेअर व्हायरसमुळे भीती

मालवेअर व्हायरसमुळे भीती

| 0 comments

मालवेअर व्हायरसमुळे भीती

मलवार व्हायरस
मलवार व्हायरस
मुंबई: गेल्या वर्षभरापासून अनेक संगणकांमध्ये असलेला मालवेअर हा वायरस येत्या सोमवारी इंटरनेट सेवेवर हल्ला कऱण्याची शक्यता आहे. त्य़ामुळे जे संगणकधारक तातडीने मालवेअर हटविणार नाहीत, त्यांची इंटरनेट सेवा सोमवारी बंद पडण्याची शक्यता आहे.

संगणकातील डीएनएस बदलून त्यातील सर्व माहिती हस्तगत करणे आणि ती माहिती सायबर विश्वात सक्रिय असलेल्या गुन्हेगारांना पाठविण्याचे काम ‘मालवेअर’च्या साह्याने केले जाते.

अमेरिकी गुप्तचर यंत्रणा एफबीआयने २००७ सालीच या वायरसचा छडा लावला होता. एफबीआयने आपल्या सर्व्हरच्या साह्याने या व्हायरसपासून जगभरातील इंटरनेट संरक्षण केले होते. मात्र सोमवारपासून एफबीआय ही सेवा बंद करणार असल्याने सामान्य इंटरनेटधारकांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

या व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. मात्र अमेरिकेप्रमाणेच इटली, जर्मनी, भारत ब्रिटन, कॅनडा फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील संगणकही या व्हायरसच्या रडारवर आहेत.
Share this article :
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

या स्तलाचे सहकारी

twitter ला जोडा

Recommend on Google

Marathi kavitas

Flash Labels byMaking Different

 
ह्या संकेत्स्तलावर दिलेल्या लिंक्स ह्या फ़क़्त reference म्हणून दिलेल्या आहे..त्याचा ह्या संकेत्स्तालाशी काहीही संबंध नाही..काही copyrighted आढळून आल्यास त्वरित संपर्क साधा .. datta_dokfode@rediffmail.com ह्या id ला मेल करा : ह्या संकेत स्तलावर सर्व कविता ह्या आमच्याच नाहीत ..ा | datta_dokfode@rediffmail.com ह्या id ला मेल करा | Dattatraya Dokfode
Copyright © 2011. Marathi Scraps for orkut users - All Rights Reserved
सहकार्य ी Creating Website
वापर झाला आहे.. Blogger